मुंबईत आज महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.बैठकीसाठी उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांसह महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.तसंच, शरद पवार यांच्या उपस्थितीचीही शक्यता वर्तवली जात आहे.विशेष म्हणजे, शिवसेनेमधून सहा आमदार फुटल्यानंतर ही पहिलीच मोठी बैठक होत असल्यामुळे या बैठकीला राजकीयदृष्ट्या वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.