Ajit Pawar अपघातप्रकरणी CCTV देण्यास नकार; RTI अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास मुंबई पोलिसांचा नकार

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे म्हणजे २८ जानेवारी २०२६ रोजीचे मुंबई विमानतळ आणि मुंबईतील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नागरी विमान सुरक्षा ब्युरो आणि मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. देवगिरी निवासस्थान ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे फुटेज देण्यास मुंबई पोलिसांनीही नकार दिला आहे. ही माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हितसंबंधाशी संबंधित नसून ती व्यक्तीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणारी असल्याचे कारण पोलिसांनी अर्जाच्या उत्तरात दिले आहे.

संबंधित व्हिडीओ