Nagpur| सुधाकर कोहळेंना फटका देण्यासाठी कटकारस्थानाची चर्चा, अवैध मतांमुळे विजयाचे गणित बदलले ?

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता अवैध मतपत्रिकांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर दोन पसंतीक्रम नोंदवण्यात आल्याने तब्बल चार हजार मतपत्रिका अवैध ठरल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा केवळ मतदान प्रक्रियेतील गोंधळ होता की कोहळेंना अडचणीत आणण्यासाठी रचलेलं एखादं कटकारस्थान..कोहळे यांच्या उमेदवारीवरून संघ परिवारातील काही घटक नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा मतदानावर काही परिणाम झाला का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

संबंधित व्हिडीओ