Nanded| मुदखेडमध्ये पाणीटंचाईचं संकट; पिण्यासाठी अवघी 2 ते 3 भांडी पाणी, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळतंय. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसातून केवळ अर्धा तास पाणी पुरवठा होतो, ज्यामध्ये जेमतेम २ ते ३ भांडीच पाणी मिळते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रोजच्या वापराच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे. Nanded | Water scarcity crisis in Mudkhed; only 2–3 vessels of drinking water available; water issue takes center stage.

संबंधित व्हिडीओ