Ulhasnagar| BJP- Shivsena मध्ये वादाची शक्यता; Eknath Shinde यांच्या नावाने कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी करणारा बॅनर उल्हासनगरमध्ये झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.“भाई, तुम्ही परत मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हा!” असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. एकीकडे उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला असताना, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. अशातच एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी करणारा बॅनर झळकल्याने नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

संबंधित व्हिडीओ