नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा विषय गेल्यावर्षी चांगलाच चर्चेचा ठरला.यंदातरी पावसाळ्यात चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करता येईल अशी वाहनचालकांना अपेक्षा होती.मात्र परिस्थिती जैसे थे असून या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. टोल भरूनही आम्ही हा सर्व त्रास का सहन करायचा ? असाच प्रश्न वाहनचालक उपस्थित करतायत