राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा नवरात्र उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच मंडप पूजन झाले होते, मात्र राज्यातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.