एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं चाललंय काय, असा प्रश्न सध्या दबक्या आवाजात विचारला जातोय. कारण एकीकडे ऑपरेशन टायगरच्या नावाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांना पक्षातले नेते विरोध करतायत.आपल्याला सोयीचे असतील तर नेत्यांना पक्षात प्रवेश द्यावा आणि आपल्याला सोयीचे नसतील तर त्यांना प्रवेश देऊ नये, असा प्रयत्न पक्षातील मातब्बर नेत्यांचा दिसतोय.आपापले जिल्हे, आणि मतदारसंघ टिकवण्यासाठी नेत्यांची ही धडपड असू शकते.. पण त्यामुळे ऑपरेशन टायगरवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतंय.