ओबीसी एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी भूमिका घेतलीए. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅझेटचा जीआर तात्काळ रद्द करा या मागणीसाठी उद्या बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आला आहे.. तर दुसरीकडे आम्ही मंत्री छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. अशी भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे. त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...