जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव बाजार समितीमध्ये दोनच दिवसात कांद्याचे दर दोन हजार शंभर रुपयांवरून एक हजार पाचशे रुपयांवर आलेत. दोनच दिवसात कांद्याचे भाव हे सहाशे रुपयांनी कोसळलेत. दरम्यान बाजार समितीमध्ये दोन दिवसात सुमारे पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे मात्र दोन दिवसात कांद्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.