जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. यामुळे पाकिस्तान संतापला आहे.पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला धमकी देणारी वक्तव्य केली जात आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून होणाऱ्या कारवाईची भीती आहे. आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिलीय.गौरी, शाहीन आणि गझनवी सारखी क्षेपणास्त्रे तसेच सुमारे 130 अण्वस्त्रे आहेत, ही शस्त्रे चौकांमध्ये सजावटीसाठी ठेवली नाही तर फक्त भारतासाठी ठेवली असल्याचे त्यांनी म्हटलंय. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि कशाचा न्युक्लिअर बॉम्ब सांगतायत अशी टीका फडणवीसांनी केलीय.