Pahalgam Terror Attack| हल्ल्याप्रकरणी NIA कडून गुन्हा दाखल,प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाची NIAकडून नोंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर 'एनआयए'ने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हल्ल्यानंतर 'एनआयए'ची पथके बुधवारपासून घटनास्थळी असून काही धागेदोरे सापडतात का याचा शोध घेत आहेत. 'एनआयए'च्या पथकांचे नेतृत्व महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून केले जात आहे. दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवण्यासाठी तपास करणारी 'एनआयए' पथके प्रवेश आणि निर्गमन ठिकाणांची बारकाईने तपासणी करत आहेत. न्यायवैद्याक आणि अन्य तज्ज्ञांच्या मदतीने हा तपास सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ