Paithan Heavy Rain | गोदावरी नदीला पूर,पैठणच्या पाटेगाव पुलावरून पुराचं पाणी; पुलावरील वाहतूक बंद

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय.धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडले आहेत.यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. दरम्यान, प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.गोदावरी नदीला पूर आल्याने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा संपर्क तुटणार आहे. पैठणच्या पाटेगाव पुलावरून पुराचं पाणी जाण्याची शक्यता असून दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटणारय. त्यामुळे पोलिसांकडून पाटेगाव पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात..

संबंधित व्हिडीओ