भारतााने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तर पाकिस्तानने ऑपरेशन बुनयाल उल मरसूस हे ऑपरेशन राबवलं.ऑपरेशन बुनयाल उल मरसूस याचा अर्थ एखादी स्ट्राँग वॉल, असा होतो.ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताला नेमकं काय मिळालं, याबाबत अम्रुल्ला सालेह अतिशय सुंदर शब्दात त्यांचं मत व्यक्त केलंय.अम्रुल्ला सालेह हे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी तालिबान्यांविरोधात मोठा लढा दिलाय.. सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भारताचं मिशन सिंदूर हे महत्त्वाचं असल्याचं सालेह यानी म्हटलंय.