पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सात मे रोजी पाकिस्तान मधल्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. शस्त्र विराम झाल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केलंय. पाकिस्तानमध्ये आयोजित एका समारंभात बोलत असताना शहबाज शरीफ म्हणाले की नऊ आणि दहा मे च्या रात्री अडीच वाजता लष्कर प्रमुख अम मुनीर यांनी हॉटलाईन वरून भारताने केलेल्या ऑपरेशन ची माहिती दिली.