पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी परिसरात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.4 नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरात असल्याची माहिती मिळतेय. भूकंपाच्या धाक्याने चारोटी, बोर्डी, दापचरी आणि तलासरी परिसरात जमिनीला सौम्य हादरे जाणवले. भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही जीवितहानी नाही.