ज्या गावात पंकजा मुंडेंना जोरदार विरोध झाला... जे गाव मराठा आंदोलनामुळे अवघ्या महाराष्ट्रात गाजलं, त्या अंतरवाली सराटी गावाला पंकजा मुंडेंनी दत्तक घेतलंय.. राज्यावर दुष्काळाचं संकट असताना, अंतरवाली सराटीची स्थितीही काही वेगळी नाही... या पार्श्वभूमीवर जालन्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी अंतरवाली सराटी गाव दत्तक घेतलंय..पुढील महिन्यात त्या अंतरवाली सराटी येथे भेट देणार आहेत..या गावात दुष्काळाच्या अनुषंगाने कामे केली जाणार आहेत...पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्यावर काम केले जाणार आहे..जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या संकल्पनेतून गाव दत्तक अभियान मोहीम राबविण्यात येत आहे.
Pankaja Munde has adopted the very village of Antarwali Sarati—the same village where there was intense opposition.