डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केलेत. या चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसेच, हे व्हिडीओ रेकॉर्डिंग किमान ६ महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते. या चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करतानाच जर वैमानिकाने मद्यप्राशन केल्याचे आढळल्या किंवा, ही चाचणी वैमानिक अथवा केबिन कर्मचारी पास करू शकला नाही तर त्याचा अहवाल २४ तासांच्या आत सादर केला जाईल.