अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न फसलाय. एक १९ वर्षीय मुलगा हिंदू मंदिरात जाऊन तिथं गोळीबार करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याची रायफल जॅम झाल्यामुळे त्याला गोळीबार करता आला नाही. अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील अरोरा शहरात ही घटना घडली.अलेक्झँडर पापोराकिस असं या १९ वर्षीय अमेरिकन तरुणाचं नाव आहे. हा तरुण हातात रायफल, ३०० हून अधिक जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ जॅकेट घालून थेट हिंदू मंदिरात घुसला होता. मंदिरात उपस्थित असलेल्या शेकडो भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करून त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, खरा. पण ऐनवेळी त्याची रायफल जॅम झाली. आणि त्याचा कट फसला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून रायफल आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, हा तरुण भारतीय वंशाच्या लोकांचा तीव्र द्वेष करत होता.
Global News | Plot to attack a Hindu temple in the US foiled; 19-year-old racist youth arrested | NDTV Marathi