अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आलीय.. मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता.. मुंबई पोलिसांनी इम्रान खानला ताब्यातही घेतलं होतं.. भारतीय नागरिक नसतानाही भारतात अशा आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल इम्रान खानवर इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आलीय. दरम्यान इम्रान खान या आदेशाविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहे. इम्रान खानला भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षातील नेते त्याच्या पाठीशी उभे राहिलेत..