फ्रान्समध्ये सोमवारपासून दोन दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद सुरु होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अध्यक्षपद भूषवणार आहेत. तसंच या दौऱ्यात ते भारत फ्रांस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाशी संवादही साधणार आहेत. या परिषदेला जागतिक नेते, महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिकारी आणि तज्ञ देखील हजेरी लावणार आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे भूराजकीय परिणाम यावरती प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीनंतर लगेचच एआय साठी पाचशे अब्ज डॉलर ची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांची AI संबंधी महत्वाकांक्षा चीनने बाजारात आणलेले दीप सिक याचा या परिषदेवरती प्रभाव पडण्याची शक्यता आहे.