गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन, Dapodi पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा Route March

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या संचलनात १८ अधिकारी आणि २५० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. हे पथसंचलन सीतांगण गार्डन, शास्त्रीनगर चौक, वरून हॉटेल, रेल्वे गेट, हिराबाई झोपडपट्टी ते कासारवाडी विसर्जन घाट या प्रमुख मार्गांवरून पार पडले. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका निर्विघ्न व उत्साहात पार पडाव्यात यासाठी नागरिकांनी तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन या वेळी पोलिसांकडून करण्यात आले; तसेच ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.

संबंधित व्हिडीओ