छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासाठी जागा देण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर ज्या ठिकाणी हाय स्पीड रेल्वेचं दालन सुरू केलं होतं त्या दालनात सरकारी कर्मचाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी बस्त नसणार आहे. पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निवेदनं स्वीकारली जातील.