भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील वाद विकोपाला जाताना पहायला मिळतंय. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काल नवनाथ बन यांच्यावर टीका केली होती. बन हे भाडोत्री पत्रकार आहेत असं धंगेकर म्हणाले होते. त्यावर आज बन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.. माकडछाप माजी आमदार माझ्यावर टीका करतात.. धंगेकर, सत्तार बोलतात ती शिवसेनेची भूमिका आहे का? असा सवाल बन यांनी केलाय.