ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची एक X पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या पोस्टमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा आहे.. राज्यसभा उमेदवारीच्या वेळी एका "विभीषणाने" भूमिका बजावल्याचा उल्लेख करत आता तीच व्यक्ती स्वतःला "हनुमान" म्हणून देश वाचवण्याच्या गोष्टी करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे..