डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर इंडिया आघाडी आता अँक्शन मोडमध्ये आलीय.. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह नेते आता चेन्नईत स्टॅलिन यांच्या घरी दाखल झालेत... इंडिया आघाडीचे एकूण 21 नेते चेन्नईमध्ये स्टॅलिन यांची भेट घेतायत.. स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान स्टॅलिन यांच्यासबोत चर्चा झाल्यावर काँग्रेसचे हे नेते मुंबईत सुद्धा येण्याची शक्यता आहे.