श्रावण महिन्यात भीमाशंकर दर्शनासाठी हजारो भाविक येत असताना खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पाऊस आणि खराब रस्त्यांमुळे प्रवासही धोकादायक बनला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भीमाशंकर दौऱ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी नाही, तर केवळ VIP मूव्हमेंटसाठीच प्रशासन जागं झालं का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.