Pune news l MPSC विद्यार्थी प्रथमेश देशमुखनं संपवलं जीवन, राज्यातलं राजकारण तापलं l NDTV Marathi

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्यानं आयुष्य संपवल्यानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरून राजकारण तापले आहे. MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. व्यवस्थाच सडलेली आहे, असा घणाघात दानवे यांनी केला.दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रथमेश देशमुख यांच्या घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत, या घटनेनंतर तरी MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन केले आहे. Pune news MPSC student Prathamesh Deshmukh ended his life, politics in the state heated up l NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ