Pune| पूजा काळेंचा शिवनेरीवर विश्वविक्रम; अवघ्या 1 तास 40 मिनिटांत शिवनेरी गडावर रांगोळी साकारली

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर रांगोळीच्या माध्यमातून पूजा काळे या शिवभक्तीचा अनोखा जागर करतात.एवढंच नाही, तर आषाढी वारीदरम्यान देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर त्या विनामूल्य रांगोळी काढून वारकऱ्यांचे स्वागत करतात. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीपासून शिवजन्मस्थळापर्यंत अवघ्या एक तास ४० मिनिटांत रांगोळी साकारत त्यांनी विश्वविक्रमही नोंदवला आहे. त्यांच्या या कलेचा, सेवाभावाचा आणि जिद्दीचा प्रवास जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी

संबंधित व्हिडीओ