विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत, निव़डणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत.कर्नाटक- आळंद मतदारसंघात 6 हजार 18 नावं वगळली गेली असून वगळलेल्या मतांमध्ये दलित,आदिवासी आणि मागासवर्गीयांची नावं असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. शिवाय महाराष्ट्रात राजुरा मतदारसंघात 6850 मतं डिलिट केल्याचंही राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोगानं ओटीपी आणि डेस्टिनेशन आयपी ट्रेल द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केली. शिवाय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार मतदार चोरांना पाठीशी घालत असल्याचाही घणाघात राहुल गांधींनी केलाय...