मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'वेव्ह्स समिट 2025'च्या पार्श्वभूमीवर विविध ऑडिटोरिअम्सची पाहणी केली.समिटच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. दरम्यान उत्तर प्रदेशच्या तुलनेत दुप्पट प्रकल्प महाराष्ट्रात आल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलाय. शिवाय मुंबईतही रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू असून जळगाव-जालना रेल्वे प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली.दरम्यान महाराष्ट्रातले 132 रेल्वे स्टेशन पुनर्विकासित करुन जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.