पावसाने दडी मारल्याचा थेट परिणाम जनावरांच्या चाऱ्यावरही होताना दिसतोय. बुलढाणा जिल्ह्यात 82 हजार दोनशे मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. मात्र पशुधनासाठी दररोज 3 हजार 433 मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. म्हणजे शिल्लक चारा फक्त 24 दिवस पुरु शकतो. त्यामुळे पावसाचा खंड कायम राहिल्यास आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. फक्त चाऱ्याचाच नाही तर खरीप हंगामानंतर उपलब्ध होणाऱ्या कडब्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. कारण खरीप पिकांची वाढ आणि उत्पादन घटल्यास कडब्याचीही टंचाई होऊ शकते.
82,200 metric tonnes of fodder remain in Buldhana due to the cessation of rain.