मराठवाड्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झालीय.. मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय.. तर जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासन हाय अलर्टवर आहे. मराठवाड्यातील 57 मंडळांत आतापर्यंत अतिवृष्टी झालीय.. बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलीय..