वसई विरार नालासोपारा या परिसरात सध्या पावसाने उसंत घेतली.मात्र तरीही काही भागात अद्याप पूरस्थिती कायम आहे.वसईतल्या चुळणे गावाचा अद्याप संपर्क तुटलेलाच आहे.चुळणे गावाला जोडणारे चारही रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालं.