मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राज ठाकरे, फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. कुठेही शिस्त नाही. बेशिस्त चालक आणि पार्किंग व्यवस्था असल्याचं राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.. शिवाय मुख्यमंत्र्यांसमोर पार्किंगसंदर्भात छोटा आढावा सादर केला.. पार्किंग, नो पार्किंग साईन्स कुणीच पाहत नाही.. त्यामुळे फुटपाथवर रंग देऊन पार्किंग, नो पार्किंग सूचना देणं गरजेचं असल्याचं ते म्हणालेत... शिवाय बाहेरुन आलेल्यांना आपल्या शहरांशी काही देणंघेणं नाही.. त्यामुळे वेळीच शहरांना शिस्त लावणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे आज म्हणाले.. बाहेरचे लोंढे थांबवले तरच शहरं सुधारता येतील असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.