भातकापणीचा हंगाम सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले असून शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक भिजून नुकसान झालंय... या भाताला आता कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली आहे... काही ठिकाणी पावसामुळे उभे पीक आडवे होऊन शेतातल्या पाण्यात भिजले आहे... वर्षभराची मेहनत पाण्यात गेली असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने इथला शेतकरी हवालदिल झालाय. ह्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी