महाराष्ट्रावर वाढलेल्या कर्जावरून राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'महाराष्ट्रासाठी घेतलेलं कर्ज कुठे गेलं?' असा सवाल विचारला आहे. तसेच, त्यांनी कौशल्य विकास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला आहे. यावर भाजपचे नवनाथ बन यांनी 'महाराष्ट्राचं दिवाळं कुणी काढलं?' असा प्रतिप्रश्न करत राऊतांवर पलटवार केला आहे.