Nepal मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी Shivsena ची मदत, 48 भारतीय सुखरुप मुंबई-पुण्यात परतले

नेपाळ महापुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मदत कक्ष सक्रिय झाला असून, राहुल कनाल यांच्या नेतृत्वात काठमांडू येथे मदतकार्य सुरू आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून नेपाळमध्ये अडकलेल्या 11 विद्यार्थ्यांना सुखरूप पुण्यात आणण्यात आले. तर कैलास मानसरोवर येथे गेलेल्या 37 भाविकांना देखील मुंबईत सुखरूप पोहोचविण्यात आले. तसेच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील आणखी 140 भाविकांशी संपर्क झाला असून, लवकरच त्यांना मुंबईला रवाना करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ