सोलापुरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता डेअरी व्यवसायावरही होऊ लागला आहे. गॅसवर आधारित अनेक डेअरी उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत....गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे दुधावर प्रक्रिया करण्यास डेअरी व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दूध तापवून बासुंदी, खवा, दही आणि पनीर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज भासते. मात्र सध्या गॅसचा पुरवठा कमी झाल्याने उत्पादनावर थेट परिणाम होत आहे....यामुळे काही डेअरी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीही कमी केल्याची माहिती समोर येत आहे.