सोलापूर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्हे तसेच इतर राज्यांमध्ये चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्व 11 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासू नये आणि आगामी काळात चारा टंचाई टाळता यावी, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात पुढील 120 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Fodder sufficient for only 120 days is available in Solapur; the Solapur district administration has taken a major decision.