असंघटित कामगारांच्या घरांची सोलापुरात स्वप्नपूर्ती झाली.पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या पाच लाभार्थ्यांना आज चावी वाटप करण्यात आलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते असंघटित कामगारांना घरांचे वाटप करण्यात आले.यावेळी फडणवीस यांनी सोलापूरसाठी मोठी घोषणा केली. सोलापुरात लवकरच आयटी पार्क उभारणार असून त्यासाठी जागा शोधण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.