न सोलापूरमधील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहामध्ये होमप्रदीपन विधी संपन्न झालाय. सिद्धरामेश्वर महाराजांचा जयघोष करत होम मैदानावरती मानकरी आणि सेवेकऱ्यांनी गर्दी केली होती. मानाच्या नंदीध्वजांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहिल्या नंदीध्वजाला नाक फणीचा साज चढवण्यात आला होता. होम मैदानावरी अग्निकुंडामध्ये कुंभार कन्येला प्रतीकात्मक स्वरूपामध्ये अग्नी देण्यात आला. पांढरा वेशातील बारा बंदी परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीत होम विधी पार पडला. अग्निकुंडात होम विधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजांनी प्रदक्षिणा घातली.