#Maldives #TobaccoBan #GenZ #Smokers #PublicHealth मालदीव सरकारने जनरेशन झेड (Gen Z) पिढीसाठी सिगारेट आणि तंबाखू सेवनावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विशिष्ट पिढीसाठी धूम्रपानावर बंदी घालणारा मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे. धूम्रपान-संबंधित आजार कमी करणे आणि तरुणांसाठी धूम्रपानमुक्त भविष्य निर्माण करणे हा या कठोर धोरणामागचा उद्देश आहे. मालदीव सरकारने धूम्रपानाबाबत इतके कठोर आणि जगातील पहिले पाऊल का उचलले आहे? या कठोर धोरणामागची कारणे आणि मालदीवचे सार्वजनिक आरोग्य लक्ष्य काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी पाहुयात हा रिपोर्ट.