कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील एसटी चालकाला धक्काबुक्की आणि काळे फासल्याच्या घटनेची एसटी महामंडळाने दखल घेतली.महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले.यावेळी जखमी चालक भास्कर जाधव यांच्याशीही प्रताप सरनाईक यांनी फोनवरून संपर्क साधत दिलासा दिलाय.या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.असं म्हणत सरनाईक यांनी चालकाला धीर दिला.तसेच कर्नाटक सरकार या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत नाही. तोपर्यंत कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द राहतील असेही आदेश मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.