रशिया -युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा हे युद्ध नव्यानं भडकणार की काय अशी स्थिती सध्या युरोपमध्ये निर्माण झालीय. युक्रेन-अमेरिका-रशिया अशा वेगवेगळ्या वाटाघाटींना सुरुवात झालीय. मात्र ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेचा बदललेला सूर हा चिंताजनक आहे. युरोपमध्येही अमेरिकेच्या नव्या भूमिकेमुळे दोन गट पडू लागले आहेत. पाहूया युद्धाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीपूर्वी युरोपमधलं वातावरण नेमकं काय आहे या ग्लोबल रिपोर्टमधून.