Akola| दहावीच्या परीक्षेत रील शूट करून पोस्ट, अकोल्याच्या सावित्रीबाई फुले शाळेतला प्रकार

अकोला शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.अकोल्यात परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.दरम्यान परीक्षा केंद्र परिसरात आणि परीक्षा देत असलेल्या वर्गातून व्हिडिओ काढून चक्क इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्र परिसरामध्ये बंदी असते, तरीही या विद्यार्थ्याने मोबाईल आतमध्ये नेला कसा..? आणि त्याने व्हिडिओ काढला कसा..? हा प्रश्न सध्या उपस्थित होतो, अकोल्यातील अग्रसेन चौकातील सवितत्रीबाई फुले माध्यमिक कन्या विद्यालयातील हा प्रकार आहे.हा विडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याव्हिडीओमुळे आता शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

संबंधित व्हिडीओ