५३ वर्षांची जुलमी राजवट उलथवून टाकल्यानंतर सीरिया सध्या एका राजकीय, सामाजिक स्थित्यंतरातून जातोय. सर्व काही सुरळीत होईल अशी आशा नवे सत्ताधारी देत असले तरी अल्पसंख्यांकांच्या मनातली भीती काही जात नाही. आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या जुलमातून जो काही समाज उरलाय तो अनिश्चिततेच्या वातावरणातच जगतोय. पाहूया सीरियातील अल्पसंख्याकांना सध्या कोणती भीती सतावतेय ते.....