दिल्लीत आज मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम होतोय.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र उपस्थिती लावली.गेल्या काही दिवसांपासून महायुतीत कुरघोडीच्या आणि नाराजीच्या चर्चा सुरू होत्या.यावरून दोन्ही नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केलीय.एकाच व्यासपीठावर असलो तरी आमच्याकडे क्लोज कॅमेरे असतात अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली.