राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आणि आमदारकी अडचणीत आलंय.कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांखाली कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.या शिक्षेनंतर कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याची कारवाई अपेक्षित आहे.मात्र दोन दिवस उलटूनही विधानसभा अध्यक्षांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.त्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय.काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहाणी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली.सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचीही अवघ्या 24 तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार? असा सवाल विरोधक करतायत. विरोधकांच्या टीकेवर राहुल नार्वेकर आणि मंत्री गिरीश महाजन यांनी काय उत्तर दिलंय पाहुयात.