अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी RSS च्या राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.भाजपच्या खासदार कंगना राणौत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी असलेल्या राष्ट्र सेविका समितीची एक बैठक पार पडली.या बैठकीला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली होती. नागपूरमध्ये आरएसएसकडे आयोजित बौद्धिकाला आतापर्यंत अजित पवार गटाचे आमदार,किंवा ते स्वतः उपस्थित राहिलेले नाहीत.. तरीही सुनेत्रा पवार यांनी थेट RSS च्या बैठकीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.